top of page

​​

प्राज्ञपाठशाळामंडळ वाई द्वारे प्रकाशित 

नोव्हेंबर २०२६ - इतिहासाचार्य वि ० का .० राजवाडे ० दीपावली विशेषांक

Price

₹300.00

यंदा म्हणजे 2026 हे वर्ष राजवाडे यांचं स्मृतिशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने गेल्या शतकभरात इतिहासविषयक लेखनात कोणत्या घडामोडी घडल्या याबाबतची चर्चा या अंकामध्ये इतिहासकारांनी केलेली आहे. आधुनिक महाराष्ट्रातील समाजाचं आकलन होण्यासाठी ज्या अनेक अभ्यासकांनी प्रयत्न केले, त्यांत विश्वनाथ काशिनाथ राजवाडे (1864-1926) यांचं कार्य संस्मरणीय आहे. भाषा, व्याकरण, इतिहास अशा अनेक विषयांमध्ये त्यांनी ग्रंथनिर्मिती केली.

या सर्व नवीन लेखांच्या जोडीला अभिजात म्हणावेत असे नवभारतच्या दफ्तरखान्यामधले काही लेखही या अंकात पुनर्मुद्रित करत आहोत.त्यांच्यामुळे नवीन आणि जुन्या लेखकांच्या इतिहासलेखनविषयक विचारांचा संगम वाचकांना पाहायला मिळेल अशी आशा आहे.

   अशा प्रकारे स्थानिक इतिहासापासून ते वैश्विक इतिहासापर्यंत गेल्या शतकभरातल्या अनेक इतिहासलेखनविषयक प्रवाहांचा आढावा या लेखांमधून घेतलेला आहे. आणखी  अनेक  सशक्त  असे  प्रवाह  इतिहासाचार्य राजवाडेंच्या  पश्चात  गेल्या शतकभरात इतिहासलेखनाच्या ज्या नवीन प्रवाहांचा महाराष्ट्रात उदय आणि विकास झाला आहे, त्यांची  थोडी  कल्पना  वाचकांना  या  लेखांवरून  येईल.

 


Quantity

bottom of page