top of page

​​

प्राज्ञपाठशाळामंडळ वाई द्वारे प्रकाशित 

खंड ७८ -- (ऑक्टोबर २०२४ - सप्टेंबर २०२५)

‘नवभारत’ मासिकाच प्रत्येक अंक विषयाला वाहून त्याचा सर्व अंगांनी विचार करून तयार करण्याचा प्रयन्त केला जातो . महाराष्ट्रातील बौद्धिक उपासमार झालेल्या सध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक वातावरणामध्ये नवभारतचे हे नवे पाऊल अतिशय मार्गदर्शक आणि उपयोगी ठरणार आहे. या प्रकाराचे विषय निवडण्यामागे गेल्या दोन दशकातील स्थितीचे अवलोकन करावे हे तसे आहे. वृत्तपत्रे तसेच नियतकालिकांतील समीक्षालेखन व परीक्षण लेखनाची जागा आता माहितीपर परिचय मजकुरांनी घेतली आहे. अशा या नवभारत मासिकाचे अमृतमहोत्सवी वर्ष नुकतेच झालेले आहे. नवभारतला लवकरच 80 वर्षे पूर्ण होतील. इतकी वर्षे नियमित प्रकाशित होणारे मराठीतील हे एकमेव मासिक असावे. नवभारतमध्ये अनेक दर्जेदार लेख दिग्गजांनी पूव लिहिले आहेत. नवभारत मासिक संपूर्णपणे लोकाश्रयावर चालते. विविध मार्गाने पैसे जमा करण्याचा प्रयत्न संपादक मंडळ करत आहे.

bottom of page