खंड ७९ - (ऑक्टोबर २०२५ - सप्टेंबर २०२६)

फेब्रुवारी म्हणजे अर्थसंकल्पाचा महिना. गेल्या वष ‘नवभारत’ने अर्थसंकल्प आणि अर्थव्यवस्था यावर विशेषांकच काढला होता. या वषचे बजेट अगदीच सरळधोपट असल्यामुळे त्यावर एक विशेषांक काढावा अशी परिस्थिती नाही. एक विस्तृत संपादकीय पुरेसे आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2026-27 सालचा अर्थसंकल्प सादर केला. या वेळची एक विशेष गोष्ट म्हणजे हा अर्थसंकल्प रविवारी, सुटीच्या दिवशी सादर झाला. त्यामुळे वित्त बाजारसुद्धा रविवार असून उघडा राहिला. निर्मला सीतारमण यांचा हा नववा अर्थसंकल्प. हासुद्धा एक विक्रमच. या अर्थसंकल्पात मानसिक आरोग्यावरसुद्धा थोडा का होईना भर आहे हेही नसे थोडके. मुलींच्यासाठी वसतिगृहे वगैरे योजना आहेत, पण फार काही नाही. काही जीवनावश्यक औषधांना आयात करातून सूट मिळाली आहे आणि ज्या आजारासाठी लागणाऱ्या औषधांना सूट आहे अशा आजारांची यादीसुद्धा वाढविण्यात आली आहे. थोडक्यात, हा अर्थसंकल्प वित्तीय शिस्त पाळणारा आणि आर्थिक वाढीला थोडा बहुत हातभार लावणारा असा आहे. खूप काही करता आले असते, पण झाले नाही. त्याचबरोबर मोठ्या गफलती झाल्या नाहीत. हेही नसे थोडके.