top of page

​​

प्राज्ञपाठशाळामंडळ वाई द्वारे प्रकाशित 

खंड ७९ -- (ऑक्टोबर २०२५ - सप्टेंबर २०२६)

नवभारतचा जानेवारी 2026चा अंक वाचकांसमोर आणताना मला आनंद होतो आहे. साताऱ्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात साहित्य संमेलन होते आहे. साहित्य संमलेन दरवष होते. पुढेसुद्धा होत राहील. नवभारतने साहित्य संमेलन आणि एकूणच मराठीतील साहित्य विश्वाविषयी सातत्याने चिंतन केलेलं आहे. 2025चा दिवाळी अंकसुद्धा अभिजात मराठी या विषयाला वाहिलेला होता. चालू अंकात साहित्य संमेलनाविषयी एक लेख आहे. तो लेख म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी 37 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केलेल्या भाषणावर आधारित आहे. हा लेख आजसुद्धा प्रस्तुत आहे. सामर्थ्यशाली एकराष्ट्रीयत्व निर्माण करण्याकरीता प्रादेशिक मातृभाषांची वाढ महत्त्वाची आहे हा मुद्दा आता पुन्हा अधोरेखित होतो आहे. “देश्य भाषांची वा मराठी भाषेची योग्यता अद्ययावत उच्च शिक्षणाचे प्रभावी साधन म्हणून अजून वाढावयाची आहे. मराठी किंवा देश भाषा असे साधन बनावे अशी बळकट उत्कंठा कोठे आहे? मराठीत किंवा देश्य भाषेतच परिश्रमपूर्वक मोठे मोठे ग्रंथ रचीन अशी भीष्म प्रतिज्ञा केलेला प्राध्यापकांचा व पंडितांचा वर्गच आज दिसत नाही आणि तसा आग्रहही कुठे दिसत नाही.” हे या लेखातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीजींचे प्रतिपादन काळ फार न बदलल्याचा पुरावा आहे. आज मराठीत ललित लेखन विपुल होते आहे.

bottom of page