top of page
खंड ७९ -- (ऑक्टोबर २०२५ - सप्टेंबर २०२६)

‘जंतर-मंतर’च्या निमित्ताने
या व्यवस्थेचा एकच चेहरा नाही. तिचे अनेक चेहरे आहेत. एखादे पद, व्यक्ती, संस्था, धोरण, समिती किंवा सरकार हे तिचे विशिष्ट रूप असू शकते. संपूर्ण व्यवस्था मात्र त्यांपैकी कोणत्याही एका रूपापुरती मर्यादित नसते. म्हणून एखाद्या मंत्र्याचा राजीनामा, एखाद्या धोरणाची माघार किंवा एखाद्या सरकारचा पराभव म्हणजे व्यवस्थेचा पराभव ठरत नाही.
कारण व्यवस्था एखाद्या, एका लढ्याने कोसळत नाही. जनतेचा संतापही स्वतःहून परिवर्तनात रूपांतरित होत नाही. त्या संतापाला स्मृती, दिशा, संघटन आणि कार्यक्रम देणारी शक्ती उभी राहते, तेव्हाच इतिहासातील विखुरलेले संघर्ष एका नव्या समाजाच्या शक्यतेत रूपांतरित होतात.
bottom of page