top of page
खंड ७९ -- (ऑक्टोबर २०२५ - सप्टेंबर २०२६)

शंभराहून जास्त वषारची, चैतन्यदायी परंपरा लाभलेल्या प्राज्ञपाठशाळामंडळाचे आविष्कारपत्र असलेल्या नवभारत मासिकाला ज्ञानसाधना, ज्ञानरचना यांची आणि ज्ञानात्मक आशयाला, प्रबोधनाच्या पातळीपयरत नेण्याची आस सातत्याने असते. या विशेषांकात ती प्रबोधनपरंपरा समकालीन संदर्भात उमटावी, तसेच पूर्वसूरींच्या चिंतनाचे संदर्भही जागवले जावेत, यांसाठी समकालीन, तसेच नव्या दमाच्या लेखक-विचारकांसमवेत नवभारतात याआधी प्रसिद्ध झालेले चिंतनात्मक लेखही समाविष्ट केले आहेत. अभिजात, इतिहास, शिक्षण, समीक्षा, परभाषा-शिक्षण, आधुनिकता, सामाजिकता आणि पूर्वप्रकाशित भाषाविषयक लेख अशी अंकाची मांडणी केलेली आहे.
bottom of page