top of page

​​

प्राज्ञपाठशाळामंडळ वाई द्वारे प्रकाशित 

खंड ७८ -- (ऑक्टोबर २०२४ - सप्टेंबर २०२५)

एक उच्च दर्जाच शैक्षणिक व सांस्कृतिक मासिक असल्यामुळे त्यामध्ये विशिष्ट प्रकारच्याच जाहिराती विशिष्ट पद्धतीनें देणें हा नियम अपरिहार्यच आहे. तथापि हा नियम पाळूनही या बाचतीत आम्हांला जेवढी आर्थिक मदत मिळणें शक्य आहे तेवढी ती झालेली नाहीं हैं नमूद करणें जरूर आहे. म्हणून समंजस व सुसंस्कृत व्यापारी बंधूंना आम्ही मदतीची विनंति करतों. ' नवभारता'च्या विशिष्ट शैक्षणिक व सांस्कृतिक स्वरूपामुळे त्यांत घ्यावयाच्या जाहिरातीच्या प्रकारांना मर्यादा पडते, त्याप्रमाणें वर्गणीदारांच्या संख्येलाही एक स्वाभाविक मर्यादा पड़ते हैं आम्ही जाणतों. ज्या सुशिक्षित व सुसंस्कृत समाजातून 'नवभारता'ला वर्गणीदार मिळणें स्वाभाविक आहे, त्याची आर्थिक स्थिति असावी तशी समाधानकारक नाहीं दें आम्हांला माहीत आहे, पण इच्छा असूनही सामथ्ये नाहीं अशी स्थिति जशी सांपडते, तसें सामर्थ्य असूनही इच्छा नाहीं असेही दृश्य दिसतें. नवसमाजनिर्मितीच्या कार्यास 'नवभारता' सारख्या प्रयत्नाला त्यागपूर्वक उचलून धरण्याची आवश्यकता आहे, एवढेच मी या वर्गातील बंधु-भगिनींना सांगू इच्छितों. 'नवभारता 'च्या वर्गणीदारांनाही एक विनंती करावयाची आहे. वर्गणची वर्ष संपतांच पुढें कोणत्याही कारणास्तव अंक सुरू ठेवावयाचा नसेल तर त्यांनी ताबडतोब तसें 'नवभारता 'च्या कार्यालयाकडे कळविणे युक्त होईल. वर्ष संपल्यावर वर्गणीदारांकडून कांही कळले नसतांना, ते पुढील वर्षीही वर्गणीदार राहून अंक चालू ठेवितील या अपेक्षेने अंक पाठावण्यांत खंड पहुं न देता, पुढेही कोही मुदतीपर्यंत कार्यालयाकडून अंक पाठावेला जातो व वर्गणी सवडीने पाठवावी अशी विनंतिंही केली जाते. या विनंतीला काही वर्गणीदारांकडून कांहीच उत्तर येत नाहीं, असे आढळून आले आहे. वर्गणीदार चालू न राहण्याचा संकल्प केला असल्यास तो न कळविणे व अंक तसेंच येऊ देत राहणें हैं योग्य नाहीं. 'नवभारता 'च्या कार्यालयाच्या दृष्टीनेही त्यांत उलगडा पडत नाहीं. समाजांतील स्रीपुरुषांनी नवसमाजनिर्मितीच्या प्रारंभकाळी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत या नीतीचा दक्षतेने अवलंब करणें अत्यंत हितावह होईल, असे मला वाटतें. आमच्या या प्रयत्नाचे महाराष्ट्रांतील स्त्रीपुरुषांनी योग्य चीज करावे अशी आमची त्यांना विनंति आहे. तसें तें करतील तर 'क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विचचे' या न्यायाने नर्वान प्रयत्न करण्याळा आम्हाला उत्तेजन व उत्साद मिळेल.

bottom of page