top of page
खंड ७८ -- (ऑक्टोबर २०२४ - सप्टेंबर २०२५)
%20cover%20page.jpg)
नवभारतचा मे 2025 चा अंक हा ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ विशेषांक आहे. प्रा. अविनाश कोल्हे ह्या अंकाचे अतिथी संपादक आहेत. भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे विविध पैलू उलगडून सांगणारे सात लेख ह्या अंकात समाविष्ट आहेत. अर्थात ह्यातील बहुतेक लेख पेहेलगामच्या भ्याड हल्ल्यापूव लिहिले गेले आहेत. पेहेलगाम नंतर परिस्थिती काहीशी बदलली आहे. पेहेलगामच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना न्याय मिळवून देणे आणि अशा प्रकारच्या भ्याड कारवाया पुढे होऊ नयेत म्हणून आवश्यक ती पावले उचलणे क्रमप्राप्त आहे. भारत सरकार योग्य ती पावले उचलेल. भारतात हिंदू-मुस्लीम संबंध बिघडावेत, धार्मिक तेढ वाढावी हा ह्या हल्ल्याचा उद्देश. दुर्दैवाने तो काही प्रमाणात सफल झालाही. ‘मुस्लीम लोकांकडून काही खरेदी करू नका’, ‘काश्मीरी लोकांवर बहिष्कार घाला’ वगैरे आव्हाने समाज माध्यमावर दिसू लागली
bottom of page